वडाळी जि.प.गटातून यशस्वी युवा उद्योजक रविंद्र राजपूत निवडणूक लढविण्यास इच्छुक
शहादा :- नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वडाळी या जिल्हा परिषदेच्या गटातून उद्योगपती रविंद्र राजपूत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली असून विविध सामाजिक कार्य व कामांच्या जोरावर ते निवडणूक लढविन्यास तयार आहेत. देऊर येथील भूमिपूत्र असलेले रविंद्र राजपूत हे नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात भाजपाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी भाजपाकडूने तिकीट मिळण्यासाठी नंदुरबार ग्रामीणचे आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्याकडे मागणीही केली आहे.
शहादा तालुक्यातील देऊर येथील भूमिपुत्र असलेले उद्योगपती रविंद्र राजपूत हे आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत वडाळी गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. वडाळी गटात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. रविंद्र राजपूत हे भाजपाचे सक्रीय व एकनिष्ठ कार्यकर्ते असून आतापर्यंत त्यांनी विविध सामाजिक, शैक्षनिक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.धुळे जिल्हातील शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथील प्रतीवृंदावन म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकाम समितीचे ते अध्यक्ष आहेत.रामराज्य मिशन संस्थेचे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष पण आहेत.सुरतसह बडोदा, अहमदाबाद,जयपूर,नेपाळ, दुबई येथे वस्त्रोद्योगाचा त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे. खान्देशातील असंख्य लोकांना त्यांनी आपल्या उद्योगातून त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. उद्योग व्यवसायात असतांना आपल्या मातीशी निगडित असलेले आपले नाते घट्ट व कायम ठेवत उद्योगपती रविंद्र राजपूत यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींसह पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्वसामान्यांशी संपर्क कायम ठेवला आहे.आगामी काळात होत असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उद्योगपती रविंद्र राजपूत(रवि शेठ) हे वडाळी जि.प.गटातून इच्छुक असल्याने तसा निर्धारही त्यांनी केला आहे.आपल्या गटाच्या सर्वांगिण विकासासाठी वडाळी गटातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळावी,अशी मागणी त्यांनी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्याकडे केलेली आहे.या गटात येणारी गाव वडाळी,फेस, बामखेडा,देऊर,ठेंभा,खैरवे, दोंदवाडा, तोरखेडा, हिंगणी गावांचा समावेश आहे. उद्योगपती रवि राजपूत हे देऊर गावाचे भूमिपूत्र असल्याने वडाळी गटातील प्रत्येक गावाशी त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर कायम आहे. विकासाच्या जोरावर रविंद्र राजपूत हे वडाळी गटातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. त्यांचे वडील हे जनसंघाचे सदस्य होते व लहानपणापासून भाजप पक्षाची त्यांचा संबंध राहिला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा पक्का निर्धार त्यांनी केला आहे.रविंद्र राजपूत यांनी वडाळी गटात आतापासून निवडणूकीच्या रणागणात उतरायचे आहे म्हणून भेटीगाठी घेवून आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.