बेहेड येथे महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
दिनांक – 5 सप्टेंबर 2025
साक्री:- साथ क्रांतिवीर फाउंडेशन, बेहेड व ग्रामपंचायत, बेहेड आयोजित ” महिला सक्षमीकरण ” प्रशिक्षण – कार्यशाळा उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाली. गावातील जवळपास शेकडो महिलांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. सदर उपक्रमात महिला आर्थिक साक्षरता, महिलांसाठी शासकीय योजना, महिलांसंबंधीत रोजगार व्यवसाय, लाडकी बहीण संबंधित इतर आर्थिक योजना, महिलांचे हक्क अधिकार संरक्षण संबंधित कायदे, महिला बचत गट योजना व इतर विषयांवर तज्ञ व्यक्ती प्रशिक्षक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲडव्होकेट श्री. चंद्रकांत येशीराव, समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री. संतोष पगारे, उमेद विभाग, श्री. ईश्वर बारी, सचिव दामिनी महिला तक्रार निवारण केंद्र, धुळे, ॲडव्होकेट श्री. नितीन पाटील. श्री. हिम्मत ठाकूर, सचिव साथ क्रांतिवीर फाउंडेशन यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी बेहेड गावाचे सरपंच श्री. अजय तोरवणे यांनी उपस्थिती लावून मान्यवरांचे व महिला माता भगिनींचे स्वागत व आभार व्यक्त केले. सदर प्रशिक्षणासाठी सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत शिपाई, लिपिक, मुख्याध्यापक व इतर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल, बेहेड यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर कार्यशाळेस बेहेड गावातील महिला माता-भगिनींनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्यामुळे व प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यामुळे सदर प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश सार्थ झाला. याबाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला.
श्री निलेश तोरवणे, संस्थापक अध्यक्ष साथ क्रांतिवीर फाउंडेशन, श्री. सुरेंद्र भदाणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.