3328 माऊली शब्दांचा वापर करून जागृतीने रेखाटले वारकऱ्यांचे चित्र …..
जगात भारी पंढरपूरची वारी ….
शिंदखेडा(प्रतिनिधी मनोज गुरव )
शिंदखेडा:- महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा व वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे .आषाढी एकादशीच्या दिक्षी लाखोंच्या संख्येने वारकरी ,व लाखो भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात अध्यात्मिक व धार्मिक दृष्टीकोनातून या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे .
आषाढी एकादशी औचित्य साधत शिंदखेडा येथील एका विद्यार्थिनीने तब्बल ३३२८ वेळा माऊली या शब्दाचा वापर करून वारकऱ्यांचे सुंदर चित्र रेखाटले आहे या विद्यार्थिनीने चित्रकलेचा कुठलाही क्लास न लावता वारकऱ्यांचे चित्र रेखाटून सर्वाना सुखद धक्का दिला आहे .त्या विद्यार्थिनीचे नाव आहे जागृती राजेंद्र बडगुजर सदरची विद्यार्थिनी शिरपूर येथे आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयात एम टेक कोस्मेटिक चे शिक्षण घेत असून पुढे पीएचडी करण्याचा मानस असल्याचे देखील जागृती हिने सांगितले या पूर्वी देखील जागृती हिने यांचे 3165 शब्द वापरून प्रभू श्रीराम चंद्राचे चित्र रेखाटले होते व सदरचे चित्र विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले होते , या विषयी बोलताना तिने सांगितले कि , ही संकल्पना माझ्या डोक्यात आली जेव्हा मी सोशल मीडीयावर वेगवेगळ्या प्रकारे विठू रायांच्या वारी विषयी उत्सुकता बघत होती पायीवारीला जाणाऱ्या वारकरीचीं आषाढी एकादशी निमित्ताने, त्यांची भजने, गाणी, नृत्य, हे बघून मनाला आश्चर्य चकीत झाले, आणि हे खूप मनाला वेधून घेणारी व आकर्षित करणारी भावना होती. हे वारकरी आहेत म्हणूनच कदाचित आपली संस्कृती टिकून राहिली आहे.
म्हणूनच यावर मी माझ्या मनाशी निश्यच केला की आपणही काहीन काही करू शकतो,काहीतरी सिद्ध करण्याची कला आपल्यात आहे हा विचार करून . मी ठरवले की , मी काहीही करून एक वेगळे प्रकारे माझी कल्ला सिद्ध करावी ती पण वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या पेनानी मी हे चित्र 3,32८ शब्दामध्ये “माऊली” या शब्दांचे नामस्मरण या चित्रांदबारे केले, आणि हे चित्र मी दोन दिवसात पूर्ण केले , याबाबत मी कल्पनाही केली नव्हती की एवढे शब्द मी लिहू शकेलं, आणि जी मी कल्पना केली, व ती पूर्ण केली व याचा निश्चितच अभिमान आहे असे जागृती हिने आमच्या प्रतीनिधी शी बोलताना सांगितले .हे चित्र रेखाटण्यासाठी जागृतीने विविध रंगांचे पेन वापरले असून तीस सेंटीमिटर लांब व रुंद असलेल्या कागदाचा वापर करून दोन दिवसात हे चित्र पूर्ण केले आहे जागृतीन वारकऱ्यांचे चित्र रेखाटल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे