धुळ्यात खाद्यपदार्थतात किडे आढळून आले
धुळे:- सविस्तर बातमी असे की धुळे शहरातील रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनयना किरण पाटील या धुळे शहरातील जय हिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉप मधून त्यांनी पब खरेदी केले होते, ते घरी आणून त्यांनी खाल्यानंतर त्यांना उलट्या व जुलाब होऊ लागले , सदरील बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले , सदरील महिला या 7 महिन्याच्या गरोदर असून त्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांचे पती यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ चेक केले असता त्यात किडे आढळून आले , त्यांच्या पतीचे ते लक्षात आल्याने ते खाद्य पदार्थ घेऊन दुकान मालक असलेल्या पराग पाटील यांना विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांनी उडवाउडवी चे उत्तरे दिली, सदरील विषय हा फूड इन्स्पेक्टर व अन्नपुरवठा विभागाचे आयुक्त यांच्या कडे कारवाई साठी तक्रार दिली आहे,
अशा भेसडीयुक्त वस्तू विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा किरण पाटील यांनी व्यक्त केले आहे