*राणा सांगा बद्दल अपशब्द – राजपूत समाज आक्रमक*
*शिरपूर महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थे तर्फे निवेदन*
शिरपूर : – महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या समाजवादी पार्टीचा उर्मट राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन (आग्रा उत्तर प्रदेश) याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थे तर्फे सभापती राज्यसभा नवी दिल्ली यांना प्रांत डॉ श्री शरद मंडलिक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
विदेशी आक्रमणा विरोधात लढणारे लढवैये महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा, जे आपला एक हात, एक डोळा व एक पाय गमावून देखील शत्रूसोबत लढले, 80 जखमा शरीरावर झेलून ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो?
उदयपूर राजस्थान चे राजे राणा सांगा यांच्या बद्दल बाबर आपल्या आत्मचरित्रात देखील लिहुन गेला आहे की “राणा सांगा आपल्या शौर्यामुळे आणि तलवारीच्या सामर्थ्यामुळे अमर झाले”. बाबर विरोधात राणा सांगा अखेर पर्यत लढले परंतु काही बाबर ची पिलावळ महाराणा संग्रामसिंग यांच्या बद्दल संसदेत अपशब्द बोलता. ‘बाबरनामा’ या बाबरच्या आत्मचरीत्रात कुठेही उल्लेख नाही की बाबर यांना राणा सांगा यांनी भारतात आणले, परंतु असा अपप्रचार करून राणा सांगा बद्दल अपमानजनक शब्द उच्चारणाऱ्या खासदार रामजी लाल सुमन याचा येथील राजपूत समाजाने त्याच्या प्रतिमेस जुता चप्पलाने मारून निषेध नोंदविला.
उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीचा राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन (आग्रा) या उर्मट, बेताल खासदाराने शुक्रवार दि 21/03/2025 रोजी साज्यसभेत महाराणा संग्रामसिंग (राणा सांगा) यांच्या बद्दल अपशब्द बोलला. रामजी लाल सुमन याच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्याची खासदारकी रद्द व्हावी, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच त्याने तात्काळ देशाची माफी मागावी या मागणी साठी शिरपूर तालुका राजपूत समाजातर्फे प्रांत, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन देण्यात आले.
राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन याच्या बेताल वक्तव्यामुळे समाजा समाजात तेढ निर्माण होऊन पूर्ण देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील राजपूत समाज आक्रमक होत असून काल करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश आग्रा येथील रामलाल याच्या घराची तोडफोड केली. आपल्या व्होट बँक साठी हिंदूंचा व सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या खासदारावर कठोर कारवाई व्हावी, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असे महाराणा प्रताप राजपूत समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महाराणा प्रताप राजपूत समाज संस्था शिरपूर तर्फे हिंदू धर्म विरोधी खासदार रामजी लाल सुमन यांच्या विरोधात ॲड कुणाल राजपूत यांच्या मार्फत स्पेशल एमपीएल कोर्ट मुंबई येथे मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.
निवेदनावर शिरपूर महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, विश्वस्त नितीनबाबा गिरासे, महेंद्रसिंग राजपूत, जयपालसिंग राजपूत, पद्मावती महिला मंडळाच्या सौ कल्पना राजपूत, सौ प्रतिभा राजपूत, माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, नेतेंद्रसिंग राजपूत, अंबालाल राजपूत, राज सिसोदिया, माजी सैनिक प्रदीपसिंग राजपूत, नितीन राजपूत, अतुल सिसोदिया, प्रशांत राजपूत, ॲड प्रविण पाटील, जयसिंग राणा, गणपत राजपूत, धिरज राजपूत, दीपक पवार, पंडित राजपूत, सागर गिरासे, प्रणव राजपूत, मनोज राजपूत, किरण चौधरी, गजेंद्रसिंग राजपूत आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.