*मराठ्यांनो छावा’ का पाहावा? जाणून घ्या ही कारणं*
शिंदखेडा प्रतिनिधी- भूषण पवार
शिंदखेडा :- विक्की कौशलचा ‘छावा’ चित्रपट सध्या चर्चेत आहे.त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिलेत, तर त्याच्या दमदार अभिनय कौशल्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. सध्या विकी कौशल ‘छावा’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.पण,छावा’ चित्रपट आवर्जुन का पाहावा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याची महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात,हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 31 कोटी रुपयांची कमाई केली.विक्की कौशल उरी द सर्जिकल स्ट्राईक सारख्या भूमिकांमध्ये खोलवर उतरण्यासाठी ओळखला जातो,पण ‘छावा’मध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय दिला आहे.छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे,केवळ कवच घालणं आणि तलवार चालवणं अस नाही या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी विक्कीनं अनेक महिने कठोर प्रशिक्षण घेतले असल्याचे दिसून येते.त्याने आपल्या दमदार अभिनयानं या भूमिकेत जीवंतपणा आणला आहे.छावा संभाजी महाराजांच्या लष्करीकौशल्य,राजकीय रणनीती आणि वैयक्तिक त्यागावर खोलवर प्रकाश टाकतो.तर मुघल बादशहा औरंगझेब ची क्रूरता बघून अक्षरशः प्रेक्षवर्गाला संताप व्यक्त होत होता चित्रपटाचा शेवट बघून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले.त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची किर्ती माहीत करुन घेण्यासाठी ‘छावा’ एकदातरी पाहायलाच हवा.
*संकलन भुषण पवार*
*’छावा’तील जबरदस्त डायलॉग्स अंगावर शहारे आणतात*
“फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की…” आणि “मौत के घुंघरू पहनके नाचते हैं हम..असे जबरदस्त डायलॉग्ज प्रेक्षकांच्या अंगावर काटे आणतात.