शिंदखेडा येथे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त दि .१२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन,,,
शिंदखेडा :- येथील माळीवाडा,जनता नगर नदी किनारी ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने पाच दिवशीय भव्य महाशिवपुराण कथेचेदि 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून सदर शिवपुराण कथा रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत चालणार असून कथा प्रवक्ते भगवताचार्य हभप प्रकाशजी महाराज जाधव यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथा संपन्न होणार असून सदर कथेस शहरातील व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर समिती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान शहरातील माळीवाडा, जनतानगर नदी किनारी भव्य दिव्य महादेव मंदिराचे निर्माण गेल्या दोन वर्षांपासून सुरु होते सदरचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी दि 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान भव्य महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे कार्यक्रम खालीलप्रमाणे राहणार आहेत
दि 14 फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य शोभायात्रा, रात्री- यज्ञ मंडप,कुंड प्रायश्चित
दि 15 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी 8 वाजता पूजेस प्रारंभ, मंडप देवता स्थापन, मूर्ती जलादिवस दुपारी अग्नी स्थापन व मूर्ती ध्यानदिवस
दि 16 फेब्रुवारी रविवार रोजी मंडप प्रात: पूजन, मुर्तोण्यास, मंदिर स्नापन ,मुर्तोशयनधिवस , दीपोत्सव
दि 17 सोमवार रोजी लघुरुद्राभिषेक, प्राणप्रतिष्ठा, दुपारी 12 वाजता महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा हभप सुदर्शनजी महाराज, धुळे यांच्या शुभहस्ते होणार असून कळस प्रतिष्ठा हभप योगी दत्तनाथ महाराज, पिलखोड यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. तरी या महान कार्यासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर समिती तर्फे करण्यात आले आहे.